Career Options for Low Scoring Students: कमी गुण मिळाले की सगळ्यात आधी मनात एकच भीती येते… आता पुढे काय? अनेकांना वाटतं की कमी मार्क्स म्हणजे आयुष्याची संधी कमी झाली. पण खरं वास्तव थोडं वेगळं आहे. मार्क्स काही दरवाजे बंद करतात, पण सगळे नाही.
सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यावी लागते. करिअर फक्त मार्क्सवर ठरत नाही, ते skill वर जास्त टिकतं. ज्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, शिकण्याची तयारी आहे, तो पुढे जाऊ शकतो. कमी गुण म्हणजे फक्त academic performance कमी आहे, क्षमता नाही असं नाही.
अशा वेळी स्वतःला हा प्रश्न विचारावा… मला नेमकं काय जमतं? पुस्तकात कमी गुण आले असतील, पण practical गोष्टीत हात चांगला असेल, लोकांशी बोलायला जमत असेल, तांत्रिक कामाची आवड असेल, creative काम आवडत असेल… तर तिकडे पाहायला हरकत नाही.
कमी गुण मिळाल्यावर काही practical पर्याय असू शकतात:
Skill based courses – electrician, plumber, mobile repairing, AC technician, welding, automobile repairing अशी कामं कधीच थांबत नाहीत. यात अनुभव वाढला की उत्पन्नही वाढतं.
IT आणि digital field – basic coding, web design, graphic design, video editing, digital marketing हे अनेक कोर्सेस कमी मार्क्स असतानाही करता येतात. इथे portfolio जास्त महत्त्वाचा असतो.
Government exams – काही सरकारी नोकऱ्यांसाठी फक्त पास असणं पुरेसं असतं. तिथे मार्क्सपेक्षा तयारी महत्त्वाची असते.
Business किंवा self employment – छोटा व्यवसाय, service based काम, online काम. अनेक लोकांनी कमी शिक्षण असूनही स्वतःचा मार्ग तयार केला आहे.
ITI, Polytechnic, Diploma – ज्यांना hands-on काम आवडतं त्यांच्यासाठी हे चांगले पर्याय असतात.
पण करिअर निवडताना फक्त “काय मिळेल” हा विचार नको. “मी टिकून राहू शकतो का?” हा विचार महत्त्वाचा आहे. कारण कोणताही मार्ग सोपा नसतो. जिथे थोडी आवड असते, तिथे टिकणं सोपं जातं.
एक मोठी चूक अनेक विद्यार्थी करतात. कमी गुण आले म्हणून स्वतःला कमी समजायला लागतात. हे टाळायला हवं. गुण कमी आले, पण आयुष्याची परीक्षा अजून बाकी असते. आणि त्या परीक्षेत प्रश्न वेगळे असतात – संयम, मेहनत, शिस्त आणि जिद्द.
म्हणून कमी गुण आले तर direction बदलायचा, पण प्रयत्न थांबवायचे नाहीत. कधी कधी सरळ रस्ता मिळत नाही, पण वळणाचा रस्ता देखील योग्य ठिकाणी पोहोचवू शकतो.
मी गेल्या 10+ वर्षांपासून Banking, Government Schemes, RTO, Property आणि Online Application संबंधित खऱ्या समस्यांवर सोपे व practical उपाय देण्याचं काम करतो. सामान्य लोकांना गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोप्या मराठीत समजावणे हा माझा मुख्य उद्देश आहे.